Home अकोले अकोले: शेतात नांगरणी करणार्‍या शेतकर्‍यावर हल्ला

अकोले: शेतात नांगरणी करणार्‍या शेतकर्‍यावर हल्ला

Breaking News | Akole Crime: शेतामध्ये नांगरणी करीत असणार्‍या शेतकर्‍यावर शेजार्‍यांकडून हल्ला.

Attack on a farmer plowing a field

अकोले:  तालुक्यातील कळस येथे शेतामध्ये नांगरणी करीत असणार्‍या शेतकर्‍यावर शेजार्‍यांकडून हल्ला करण्यात आला असून, दगडफेकीत ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कळस येथील दीपक पुंजा वाकचौरे हे त्यांच्या शेतामध्ये बुधवारी (दि. 19 जून) दुपारी दोनच्या दरम्यान नांगरणी करीत होते.

यावेळी शेजारील शेतकर्‍यांनी हे वावर नांगरू नको, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली तसेच हे वावर नांगरलं तर आम्ही तुझा खून करू, अशी धमकी देऊन ट्रॅक्टरवर दगडफेक केली. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दीपक वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी रामभाऊ एकनाथ वाकचौरे व बाळासाहेब काशिनाथ वाकचौरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Web Title: Attack on a farmer plowing a field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here