Home महाराष्ट्र दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केलंय त्यांनी; मनोज जरांगेंचा...

दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केलंय त्यांनी; मनोज जरांगेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Maharashtra Assemble Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा फॅक्टर किती प्रभावी ठरतो.

Assemble Election Manoj Jarange attack on Chandrakant Patil

Manoj Jarange attack on Chandrakant Patil: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा फॅक्टर किती प्रभावी ठरतो हे समोर येईलच. पण सध्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे.

चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. शेतकर्‍यांच्या मालाला भाव दिला. शेतकर्‍याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या कराराला लावल्या, दहा वर्षांपूर्वीच त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले. म्हाडाचे घरकुल गरीबांना द्यायचे ते त्यांनीच घेतले. खूप चांगले काम केले आहेत त्यांनी. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. परत मराठ्यांना SCBC आरक्षण देऊन EWS मध्ये घातलं छान काम आहे. दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केले आहे त्यांनी. मराठ्याच्या पोरावर केसेस केल्यात, महिलांना बंदुकीने ठोकलं, गोळ्या घातल्या काय चांगलं काम केलं. देव माणूस आहे दादा, शेंदूर लावायला पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपाचे सुद्धा असतात दिवसा सुद्धा येतात भाजप मधले तिकीट हुकलेले ते तर जाहीर आहेत आता .देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्यामुळे सगळा मराठा समाज चिडलेला आहे. आम्ही ताकदीने बलाढ्य होतो. मात्र आम्हाला गिणतीत घेतले नव्हते. आता गोरगरीब मराठ्यांच्या चपलांसकट पाया पडत आहेत. आज सगळे नेते मराठ्यांना विचारायला लागले ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका:

देवेंद्र फडणवीस घरात बसून गणित मांडतात. म्हणून वाटतं हा माणूस खूप छान आहे असं थोडी ढेरी मोठी आहे. नंतर भाजपच्या लोकांना वाटतं हे काय लफडं झालं म्हणून सांगतो हे आरएसएस संपवायला लागला हे भाजप संपवायला लागला. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या राज्यातील भाजप संपेल दुसरे कोणामुळे नाही, असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर बसून जमत नसतं. आम्ही आरक्षण मागीतलं. आम्हाला दिलं नाही, आमच्या डोळ्यात देखत ओबीसींना दिलं. फडणवीस हे मस्तीत जगणारा माणूस आहे, त्यांनी मराठ्याला खुन्नस दिली आता मराठा तुम्हाला जुमानत, मानत नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Assemble Election Manoj Jarange attack on Chandrakant Patil

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here