Home अकोले अकोलेतील व्यापार्‍याची फसवणूक करणारा गजाआड, एक कोटीची फसवणूक

अकोलेतील व्यापार्‍याची फसवणूक करणारा गजाआड, एक कोटीची फसवणूक

Akole News:  व्यापार्‍याची सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकास अटक.

Arrested who cheated a businessman in Akole, defrauded one crore

अकोले:  अकोले येथील कांदा व्यापार्‍याची सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकास  अटक केली आहे.  जयेश सन ऑफ गोंपिनाथन (रा. त्रिशुर, केरळ) असे संशियीत आरोपीचे  नाव आहे. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, कोतूळ (ता. अकोले) येथील कांदा व्यापारी सिताराम काशिनाथ देशमुख (वय 58) यांची एक कोटी 53 हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी सन 2017 मध्ये अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन शेख, अंमलदार अजय खोमणे, नियाज शेख यांनी गोंपिनाथन याला अटक केली आहे.

सदरचा गुन्हा प्रोपा पी.पी.एच. टेडर्स, सी.एन.व्ही.मार्केट पालायाम (जि. कालीकेट, केरळ), प्रोप्रा सी.ए.ब्रदर्स, (मार्केट रस्ता, थोडूपुंजा, केरळ), प्रोप्रा अल्मास वनयण ट्रेडींग कंपनी (त्रिंमबावर, त्रिसुर, केरळ), जयेश सन ऑफ गोंपिनाथन व अब्दुला (रा. टेंपलगेट, ता. तलसरी, जि. कन्नुर, केरळ) यांच्याविरोधात दाखल झालेला आहे.

संशयित आरोपी यांनी कांदा व्यापारी देशमुख यांच्याकडून संगनमताने 64 ट्रक कांदा विक्रीसाठी घेतला होता. सदर कांद्याच्या व्यवहारापोटी देणे असलेली एक कोटी 53 हजारांची रक्कम देशमुख यांना न देता त्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान, फसवणूक झाल्यानंतर देशमुख यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने दिलेल्या सीआरपीसी कलम 156(3) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Arrested who cheated a businessman in Akole, defrauded one crore

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here