तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या एका 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Breaking News | Buldhana Crime: आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर.
बुलढाणा: आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील एका गावात ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या एका 8 वर्षीय चिमुकलीला चॉकलेट साठी 5 रुपये देतो असे आमिष दाखवून आरोपीने तिला आपल्यासोबत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. राजेश विंचू असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. गावातील काही महिलांनी या मुलीला घेऊन जात असताना राजेशला पाहिले होते.
त्यावरून पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Web Title: An 8-year-old girl studying in class III was molested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study