Home अकोले अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व

अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व

अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व

अकोले प्रतिनिधी – अकोले तालुक्यात नुकत्यास झालेल्या २१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री  मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे युवा आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली १७ ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला असून अकोले तालुका राष्ट्रवादीच्याच पाठीमागे असल्याचे सिध्द झाले, असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व सेक्रेटरी यशवंतराव आभाळे यांनी केला आहे.
    अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील १९ ग्रामपंचायती व प्रवरा पट्टयातील २ अशा एकूण २१ ग्रामपंचायतींची निवडणुक लागलेली होती त्यापैकी पाचनई ग्रामपंचायत बिनविरोध होवून सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सौ।पार्वताबाई घोगरे याची निवड झाली. आज सर्व २० ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत आदिवासी भागातील १९ पैकी १६ तर प्रवरा पट्टयातील २ पैकी १ अशा १७ ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद बहुमत मिळवत राष्ट्रवादीचे वर्चस्व सिध्द केले आहे. या ग्रामपंचायत निवडणूक विरोधी पक्षांनी प्रतिष्ठीची करत मतदारांच्या दारोदारी फिरत मतदारांना भुलथापा मारण्याचा पुरेपुर प्रयत्न केला मात्र मतदाराने या विरोधाकांच्या भुलथापांना न फसता पुन्हा एकदा तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री मधुकररावजी पिचड व युवा आमदार वैभवरावजी पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे.
    या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडुन आलेले गावनिहाय सरपंच पुढीलप्रमाणे पाचनई ग्रामपंचायतीची सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सौ।पार्वताबाई घोगरे या बिनविरोध, संपत रामचंद्र झडे (रतनवाडी), सखाराम भदु उंबरे (मुतखेल), सोमनाथ लक्ष्मण वाळेकर (वांजुळशेत/ पुरुषवाडी), हिरामण चिंधू भांगरे (कोहणे), अंजना भगवंता भांगरे (पिंपळदरावाडी), जनाबाई रविंद्र खाडे (जहागिरदारवाडी), मंदाताई शंकर कुलाळ (पेढेवाडी), मंजुळा भगवंता खोकले (पाचट्टावाडी), संगिता रमेश गोडे (तिरडे/ शिवाजीनगर), सयाजी तुकाराम अस्वले (कुमशेत), विमल परशुराम पदमेरे (पेंडशेत), द्रौपदा धोंडू भांगरे (शिसवद), तुकाराम सोमा खाडे (बारी), चंद्रप्रभा मारुती बांडे(साम्रद), नारायण तुकाराम जाधव (कोकणवाडी), नाना शंकर जाधव (सुगांव बु) या निवडुन आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी मंत्री मधुकररावजी पिचड व युवा आमदार वैभवरावजी पिचड यांनी अभिनंदन केले. 

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here