Home अकोले अकोले: पिंपळदरीत ५५ विद्यार्थ्यांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

अकोले: पिंपळदरीत ५५ विद्यार्थ्यांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

अकोले: पिंपळदरीत ५५ विद्यार्थ्यांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

अकोले: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील ह.भ.प.रामकृष्णहरी बाळाराम महाराज महाराज रंधे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ५५ विद्यार्थ्यांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रो आजाराची लागण झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील ह.भ.प.रामकृष्णहरी बाळाराम महाराज महाराज रंधे यांची वारकरी शिक्षण संस्था असून यात ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात मुला मुलींचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी दुपारी मटकी आणि भाकरीचे जेवण दिले त्यानंतर पाणी पिल्याने काही वेळातच या विद्यार्थ्यांना उलट्या जुलाब होऊ लागल्याने शाळा व्यवस्थानाने तत्काळ एका पिक अप जीप मधून या सर्व मुलांना घारगाव येथील प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

You May Also LikeSonam Kapoor age | Sonam Kapoor Biography

रुग्णालयात तत्काळ उपचार मिळाल्याने सात विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. ४३ विद्यार्थ्यांना तेथेच उपचार सुरु ठेवण्यात आले तर प्रकृती खालावल्याने सहा विद्यार्थ्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Fashion Ad


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here