अकोले नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र तर कॉंग्रेस
अकोले | Nagar Panchayat Election: अकोले नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. काल दि.24 नोव्हेंबर रोजी अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला. सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठीचा कालावधी अत्यल्प असल्याने व अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आज नगरपंचायत निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची व निवडणूक नियोजनासाठी मीटिंग भाजप च्या पक्ष कार्यालयात आज घेऊन निवडणूकीच्या तयारीत भाजप ने आघाडी घेतली आहे. यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री.पिचड बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव,तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,जिल्हा महिला अध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,ऍड वसंतराव मनकर,अमृतसागर दुध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे,उपसभापती दत्ता देशमुख, अमृतसागर चे संचालक गोरख मालुंजकर,अगस्तीचे संचालक राजेंद्र डावरे,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख,अकोले शहराध्यक्ष सचिन शेटे,शहर सरचिटणीस हितेश कुंभार,बाळासाहेब वडजे,परशराम शेळके, शरद नवले,अनिल नाईकवाडी अमोल वैद्य,अमित रासने,रमेश नाईकवाडी, सचिन जोशी,धनंजय संत, नाजीम शेख,विजय पवार, आदींसह शहरातील व्यापारी, नागरीक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजीमंत्री पिचड म्हणाले की, अकोले नगरपंचायत निवडणूक ही विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम लागली असून, यावर पुढे होऊ घातलेल्या संस्थांच्या निवडणूका अवलंबून आहेत. ही नगरपंचायत निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची असून सर्वानी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी.सर्व सेल चे अध्यक्ष, पदाधिकारी,महिला,बूथ कमिटी, व्यापारी यांना या मध्ये सहभागी करून घ्यावे.युवकांच्या हातात ही निवडणूक द्यावी, या साठी जेष्ठ मंडळींची एक समिती तयार करून त्यांच्या मार्फत कोणत्याहि प्रभागात निवडणूकि संदर्भात अडचण असल्यास ते सोडवून घ्यावी.सध्या एक एका प्रभागात दोन तीन उमेदवार इच्छुक असून भाजपकडे युवकांचा कल वाढलेला आहे. हे चांगले द्योतक आहे.इच्छुक उमेदवारांनी आपली नावे, त्या बरोबर पाठींबा देणाऱ्या मतदारांची यादी तालुकाध्यक्ष यांचेकडे द्यावी. 27 तारखेला सर्वांचा मेळावा आयोजित करावा. वैभवराव पिचड ,पक्षाचे जिल्ह्यातील नेते, निरीक्षक,उमेदवारी बाबत निर्णय घेतील. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना सर्वानी सहकार्य करून सर्व 17 प्रभागात उमेदवार निवडून आणायचे आहेत. कोणाचे कोठे नातेवाईक असतील तर त्या गावातील नेत्यांशी संपर्क साधून ती मते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. बाहेर गावी असलेले मतदार घेऊन येण्याची व्यवस्था करावी,नामनिर्देशन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आतापासून इच्छुक उमेदवारांनी जमा करावी. युवकांनी मतदारांचा डाटा तयार करून त्यांचे वर्गीकरण करा. युवकांवर जबाबदारी द्या,जास्तीत जास्त मतदान घडवून आणावे.आत्मविश्वासाने निवडणूकिला सामोरे जा.गटबाजी न करता प्रामाणिकपणे काम करा. विरोधक अप प्रचार करतील,त्याला घाबरू नका, उत्तरे द्या,सर्व ताकदीनिशी निवडणूक लढावी. अकोले नगरपंचायत ने अतिशय चांगले काम केले असून अगस्ति कारखाना व्यवस्थित चालू असल्याने अकोले शहराच्या बाजारपेठेला त्याचा फायदा झाला आहे. अकोले नगरपंचायत निवडणूक अतिशय महत्वाची आहे याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी अशा सूचना केल्या.
ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
यावेळी जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ म्हणाले की,नगरपंचायत निवडणूकीच्या काळात सर्वांनी एकदिलाने काम करून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला उत्तर द्यायचे आहे. विरोधकामध्ये तीन गट झालेले आहेत.त्यांचा पक्षआता सेवा निवृत्त कर्मचारी चालवीत आहे. आता ते आपल्याला राजकारण शिकवीत आहे. ज्यांनी 40 वर्षे राजकीय संघर्ष केला आता ते या निवृत्त कर्मचाऱ्यांचा मागे फिरत आहे अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.आता कोणतेही पक्ष एकत्र येणार नाही. ज्याना बेईमानी करायची आहे,त्यांनी भाजप मध्ये राहू नये.त्या बेईमानाचा फटका विधानसभेच्या निवडणूकित वैभवराव यांना बसला होता. असा सल्ला दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव व तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ऍड वसंतराव मनकर यांनी आभार मानताना, अकोले शहराच्या विकासासाठी माजीमंत्री पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आपणास एकत्र व प्रमाणिकपणे नगरपंचायत निवडणूक करणार आहोत. विधानसभा निवडणुकीत झालेली चूक जनतेच्या लक्षात आली असून त्याचे संकट ओढावून घेतल्याचे परिणाम दिसत आहे.त्यामुळे सर्वानी एकत्र राहून सर्व 17 प्रभागाच्या उमेदवारांना सहकार्य करायचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्याची ही सुवर्णसंधी आहे.विरोधकांची वेगवेगळे लढण्याची ताकद राहिलेली नाही,त्यांना त्यांची ताकद व मर्यादा माहीत झाल्याने त्यांना सर्वाना आपल्याविरुद्ध एकत्र लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आपली ताकद मोठी असून विचलित न होता ताकदीनिशी निवडणूक लढवावी. स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहर सरचिटणीस हितेश कुंभार यांनी केले. या मीटिंग साठी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने उत्साहाचे वातावरण होते. चौकट- काल शिवसेनेची नगरपंचायत निवडणूकीसंदर्भात विचारविनिमयाची मीटिंग झाली.राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय झाला असून काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचा पक्षादेश काढलेला आहे.त्यामुळे महाविकास आघाडी होणार की नाही हे येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी सर्व 17 प्रभागात उमेदवार देण्याची चाचपणी केली असून आज किंवा उद्या याबाबत त्यांची मीटिंग होऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी कालावधी अतिशय कमी असल्याने व अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवार जाहीर करणे ही डोकेदुखी ठरणार आहे.
Web Title: Akole Nagar Panchayat Election