Home अहिल्यानगर पतसंस्थेवर भरदिवसा गोळीबार करत दरोडा, शाखाधिकारी यांच्यावर गोळीबार  

पतसंस्थेवर भरदिवसा गोळीबार करत दरोडा, शाखाधिकारी यांच्यावर गोळीबार  

Ahmednagar News Robbery by firing on Patsanstha all day long

पारनेर | Ahmednagar News: अहमदनगर पुणे महामार्गावर बेलवंडी फाटा येथे असलेल्या बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्था शाखेवर अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करत पाच लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे, शनिवार दिनांक ७ ऑगस्ट दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत महिती अशी की, नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेची शाखा आहे. शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी २:३० वाजेच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला आणि रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड काढून घेतली. यावेळी शाखाधिकारी सोनवणे शाखेत पोहचले त्यांनी दरोडेखोरास झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न सुरुवातीस केला असता दरोडेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. व रोख रक्कम ५ लाख २० हजार घेऊन आपली मोटारसयकल होंडा शाईन घेऊन पुण्याच्या दिशेने पसार झाले. हा प्रकार सी.सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत आहे .

शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळीबार केला असून छातीच्या खाली गोळी लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

बाळासाहेब सोनवणे यांच्या छातीखाली गोळी लागल्याने त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने सोनवणे यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar News Robbery by firing on Patsanstha all day long

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here