अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात वेश्या व्यवसायावर छापा, महिलेवर गुन्हा
Ahmednagar | राहुरी | Rahuri: बनावट ग्राहक पाठवून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील घरातच घरातच सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Prostitution Business) पोलिसांनी छापा (Raid) टाकून पर्दाफाश केला आहे. सोमवार दि. 9 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुहा शिवारात ही कारवाई करण्यात आली.. याप्रकरणी कुंटणखाना चालक महिलेवर राहुरी पोलीस ठाण्यात पिटांतर्गत गुरनं व कलम -॥ 388/2022 या व मुली यांचे व्यापारास ( प्रतिबंध ) कायदा 1958 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी संबंधित महिलांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्या ठिकाणी छापा मारला असता तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर एका महिला आरोपीविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. या प्रकरणी एका महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात प्रचलीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुहा गावात भर मध्यवस्तीत हा व्यवसाय सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Web Title: Ahmednagar Guha Home Prostitution Business Raid