Ahmednagar News: पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत २ सप्टेंबरला तिकीट तपासणीला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला.
श्रीरामपूर: बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीला येथील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत २ सप्टेंबरला तिकीट तपासणीला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी बेलापूर स्थानकावर उतरविण्यात आले. त्यानंतर साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही व्यक्ती मृतदेह घेण्यासाठी पुढे आलेला नाही. अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्षे आहे. त्याची उंची पाच फूट तीन इंच असून, कपाळावर उजव्या बाजूला व्रण आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला आहे..
Web Title: Ahmednagar Dead body in running trains
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App