Ahmednagar: जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४२ बाधित
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील आज ७४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३३ टक्के इतके झाले आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांत मनपा १५४, संगमनेर ४३, राहता ७९, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ३२, श्रीरामपूर ३५, कॅन्टोनमेंट ४, नेवासा ७४, श्रीगोंदा २९, पारनेर २८, अकोले २०, राहुरी १०९, शेवगाव २९, कोपरगाव ३१, जामखेड १७, कर्जत ११, मिलिटरी हॉस्पिटल १२ इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज १२ वाजेपर्यंत ४२ रुग्णांची भर पडली आहे. सध्या ३४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज ४२ बाधित यामध्ये मनपा १९, संगमनेर १, नगर ग्रामीण ३, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट १, राहुरी २, मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ३८ हजार २०१ इतकी झाली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Corona update today 23 sep