अहमदनगर जिल्ह्यात आज ८५६ करोनाबाधितांची भर
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात(गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत) ८५६ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार सुरु असलेल्या रुगानांची संख्या ४३३९ इतकी झाली आहे.
अॅटीजेन टेस्टद्वारे २४५ रुग्ण, खासगी प्रयोगशाळेतून ४३८ रुग्ण, जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून १७३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन टेस्टद्वारे २४५ रुग्ण बाधित यामध्ये मनपा ४२, संगमनेर ९, राहता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १० पारनेर ७, अकोले २०, राहुरी ३. कोपरगाव ९, जामखेड १६,म कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेतून ४३८ रुग्ण यामध्ये राहता ४१, पाथर्डी १, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपूर ६४, कॅन्टोनमेंट ७, नेवासा १६, श्रीगोंदा ४, पारनेर १८, अकोले ५, राहुरी ४१, शेवगाव ३, कोपरगाव ९, जामखेड २, कर्जत १, मनपा १६०, संगमनेर ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून १७३ रुग्ण बाधित यामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८, पाथर्डी ४, नगर ग्रामीण २०, कॅन्टोनमेंट ३, नेवासा २३, पारनेर १, अकोले २०, राहुरी १, शेवगाव ५, कोपरगाव १२, जामखेड १८ मिलिटरी हॉस्पिटल ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २९५१४ इतकी झाली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४७३१ इतकी झाली आहे. एकूण मृत्यूची संख्या ४४४ इतकी झाली आहे. ४३३९ इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
Web Title: Ahmednagar corona Update today 11 September 2020