Home अहमदनगर अहमदनगर: अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारपीट

अहमदनगर: अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारपीट

Breaking News | Ahmednagar: पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारपीट कांद्याचे मोठे नुकसान; घरांवरील पत्रे उडाले ६ जनावरे दगावली.

Ahmednagar Bad weather, hail with gale force winds

जामखेड : तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी (दि. १७) झालेल्या अवकाळी पावसाने झोडपले असून, भुतवडा, कुसडगाव, जवळके आदी गावांना अवकाळीचा फटका बसला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी वीज पडून ६ जनावरे दगावली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत काही ठिकाणचे पंचनामे करण्यात आले असून, काहींचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.

तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बुधवारी (दि. १७) तालुक्यात दुपारी श्नंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घडल्या. भुतवडा, कुसडगाव, जवळके गावांसह काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शेतकरी आधीच दुष्काळ पडल्याने आर्थिक अडचणीत सापडले असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याने हतबल झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

भुतवडा येथील शेतकरी उद्धव पांडुरंग डोके यांचे वासरू, कुसडगाव येथील शेतकरी विभिषण भोरे यांची गाय, जवळके येथील शेतकरी अंकुश वाळुंजकर यांच्या दोन गायी, तर दादासाहेब पांडुरंग हंडोळे यांचा बैल वीज पडून दगावला आहे.

पाथर्डी तालुका :  तालुक्यातील पूर्व भागातील तीनखडी, चिंचपूर इजदे, टाकळी मानूर, भिलवडे, चुंबळी परिसराला बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. काढलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने बीजपुरवठा खंडित झाला.

दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्यासाठी सूचना करण्यात आल्या असून, त्यानुसार काही ठिकाणचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.

तीनखडी गावातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे संपूर्ण मंडप वादळात उडून गेला. आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या गळून पडल्याने मोठा खच जमिनीवर पडला होता. सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतून तालुका जात असताना अवकाळीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. मंगळवारी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. त्यामध्येही मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी व नागरिक बाहेर पडत नाही, तर दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) वादळी वाऱ्यासह गारपिटीने व आलेल्या पावसाने चांगलेच नागरिकांना झोडपले.

Web Title: Ahmednagar Bad weather, hail with gale force winds

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here