अहमदनगर: अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण
Breaking News | Ahmednagar: एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून तिला पळवून नेण्यात आल्याची घटना.
राहुरी: राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातून एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून तिला पळवून नेण्यात आल्याची घटना दि. ७ ऑगस्ट रोजी घडली आहे.
या घटनेतील १७ वर्षे १० महिने वय असलेली अल्पवयीन तरुणी तालुक्यातील पश्चिम भागात तिच्या कुटुंबासह राहते. ती १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सदर महाविद्यालयीन तरुणी शाळेला जाते आणि शाळा सुटल्यानंतर तशीच तासाला जाऊन येईल असे सांगून घरातून बाहेर गेली होती. तिच्या नातेवाईकांनी तिला दुचाकीवर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. त्यानंतर दुपारी ३ वाजे दरम्यान सदर तरुणीच्या एका मैत्रिणीने तरुणीच्या आईला फोन करून त्यांची मुलगी तासाला येणार की नाही, अशी विचारणा केली. तेव्हा तरुणीच्या आईने सांगितले ती सकाळीच आलेली आहे. तेव्हा मैत्रिण म्हणाली की, ती सकाळपासून महाविद्यालयात आलेली नाही. त्यानंतर महाविद्यालयीन तरुणीच्या नातेवाईकांनी परीसरात व आजुबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यावेळी आपल्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची नातेवाईकांची खात्री झाली. नंतर तरुणीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Abduction of minor college girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study