Home अहिल्यानगर अहिल्यानगरच्या डॉक्टर महिलेचा अमेरिकेच्या ढगफुटीत मृत्यू

अहिल्यानगरच्या डॉक्टर महिलेचा अमेरिकेच्या ढगफुटीत मृत्यू

Breaking News | Ahilyanagar: अमेरिकेतील ढगफुटी पावसामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Ahilyanagar woman doctor dies in US cloudburst

राहुरी:   राहुरीच्या वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीबांची सेवा करणार्‍या दंत चिकित्सक डॉ. अनुपमा वैद्य-चांदोरकर, (वय 62) यांचा अमेरिकेतील ढगफुटी पावसामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. डॉ. अनुपमा वैद्य व त्यांचे पती स्व. डॉ. अनिरुद्ध वैद्य या दाम्पत्यांनी राहुरीत हजारो रुग्णांची सेवा केली होती.

राहुरी येथील दंत चिकित्सक डॉ. अनुपमा वैद्य-चांदोरकर यांचे 21 जुलै 2025 रोजी अमेरिकेतील कॅन्सस येथील ओव्हरलँड पार्क येथे निधन झाले. त्यांचा अहिल्यानगर आणि अमेरिकेतही मोठा परिवार आहे. त्या राहुरी येथे असताना 2003 मध्ये राहुरी ते नगर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना वेळेवर मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला होता. त्यांचे पती डॉ. अनिरुध्द वैद्य यांचे करोना काळात झालेल्या अपघातात निधन झाले होेते.

अमेरिकेत ईशान्य कॅन्ससमधील जॉन्सन कंट्री येथे आपल्या मुलीकडे डॉ. वैद्य गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या. सकाळी त्या पायी फिरायला जात असत.

सोमवारी दि. 21 रोजी सकाळी दक्षिण ओव्हरलँड पार्कच्या ट्रेलवरून चालत असताना अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला. तेथील नाल्याला पूर आला. त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्या फिरून लवकर घरी न आल्याने त्यांच्या मुलीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी शोध घेतल्यावर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती ओव्हरलँड पार्क पोलिस विभागाचे प्रवक्ते जॉन लेसी यांनी दिली. त्यांच्या पश्चात दोन मुली, डॉ. अदिती आणि प्रीती, जावई, धनंजय आणि सौमित्र, नातवंडे, आयुष, मायरा आणि ध्रुव असा परिवार आहे.

Breaking News: Ahilyanagar woman doctor dies in US cloudburst

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here