Home क्राईम दृश्यम पाहून स्वत:च्या आई-वडील, भावाची हत्या

दृश्यम पाहून स्वत:च्या आई-वडील, भावाची हत्या

Breaking News | Crime: आई वडील आणि भावाचा खून  करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील  वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव. (Murder Case)

After seeing the scene, he killed his own parents and brother

हिंगोली : डिग्रस वाणी गावातील दुचाकी अपघाताचं गूढ उघडकीस आले आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि भावाचा खून (Killed) करुन बाईक अपघाताचा बनाव रचल्याची घटना घडली होती. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून खुनाचा कट रचल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.   आई वडील आणि भावाचा खून  करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील  वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव केला. परंतु आरोपीचे हे बिंग फोडत हिंगोली पोलिसांनी या खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा केला आहे.

काही दिवसापूर्वी डिग्रस वाणीच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला होता. मृतांची नावे कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी होती.  मात्र हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.  मयत जोडप्याच्या दुसऱ्या मुलानेच म्हणजे महेंद्र जाधव याने आई-वडिल आणि भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचला.  आई वडिल आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या रागातून महेंद्रनं हे नात्याला काळिमा फासणारे धक्कादायक कृत्य केलं. महेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील डीग्रसवाणी या गावलागत 11 जानेवारीला वळणालगत एक अपघात झाल्याची घटना घडली होती.  या मोटासायकल अपघातात कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि आकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता.  ही माहिती महेंद्र जाधव ने स्वतः  पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली परंतु अपघातस्थळी अपघात नसून अपघाताचा बनाव केला जात असल्याचा  संशय पोलिसांना आला.  त्यावरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवले. तर मृत दाम्पत्याचा मुलगा आणि  मयत आकाशचा भाऊ महेंद्र जाधव वारंवार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तागादा लावत होता.

घडलेल्या घटनेत साम्य आढळतं नव्हते.  त्यामुळे  पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि पोलिसांनी महेंद्र जाधवला चौकशी साठी ताब्यात घेतले.  आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी महेंद्र जाधवला त्याच्या आई वडील कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव हे पैसे देत नव्हते.  भाऊ आकाश जाधव सुद्धा नातेवाईकांमध्ये त्याचा अपमान करत असे त्यामुळे स्वतःच्याच आई-वडील आणि भावाला मारून टाकण्याचा कट त्याने दिवाळीपासून रचला होता.  त्यासाठी महेंद्र जाधव ने दृश्यम हा चित्रपट तब्बल पाच वेळा पाहून आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग पाहून खून करण्याचा कट रचला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: After seeing the scene, he killed his own parents and brother

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here