Home अहिल्यानगर अहमदनगर: विवाहितेवर जीपमध्ये अत्याचार आरोपीला अटक

अहमदनगर: विवाहितेवर जीपमध्ये अत्याचार आरोपीला अटक

Breaking News | Ahmednagar: एका विवाहितेवर जीपमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल.

Accused of abused married woman in jeep arrested

श्रीरामपूर :अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका विवाहितेवर जीपमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव इजाज बागवान असे आहे. अत्याचारित महिला ही शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये खबडी परिसरात राहते. २० दिवसांपूर्वी ती कामावर जाताना इजाज याने तिचा पाठलाग केला होता. त्याबद्दल त्या महिलेने विचारणा केली. त्याची ओळख विचारली. त्यावर त्याने इजाज बागवान असे नाव सांगितले. त्याने महिलेशी बोलण्याचा आग्रह धरला. त्यास महिलेने नकार दिला असता संध्याकाळी कामावरून घरी येताना पुन्हा त्याने पाठलाग केला होता. घरी गेल्यावर आरोपी इजाज हा तेथे आला. आपला विवाह झालेला असून दोन मुले आहेत, असे आरोपीला सांगितले.

मात्र, त्याने पतीने सोडून दिलेले आहे. त्यामुळे नाटक करू नको असे धमकावले. हा सर्व प्रकार पाहून मुले रडू लागली. त्यानंतर इजाज तेथून निघून गेला, असे फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे. १९ जुलै या दिवशी कामावर जात असताना इजाज बागवान हा काळी पिवळी जीप घेऊन आला. त्याने हात धरून बळजबरीने गाडीत बसविले. तोंडात मारून अत्याचार केला. त्यानंतर कुणाला सांगितले तर दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: Accused of abused married woman in jeep arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here