२० फूट घासत जात शिवशाही बस उलटली, ११ ठार, २९ जखमी
Shivshahi Bus Accident: दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस उलटून ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची भीषण घटना.
सडक अर्जुनी | जि. गोंदिया : दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस उलटून ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी गोंदिया-कोहमारा मार्गावरील खजरी गावाजवळ घडली. प्रवासी खाली दबल्याने, त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली.
भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस भंडाऱ्याहून सकाळी १०:४० ला गोंदियासाठी खाना झाली. ४० प्रवासी असलेल्या बसचे चालक प्रणय रायपूरकर (४०) व वाहक नितीन मते (३८) हे होते. सडक अर्जुनी पार केल्यानंतर चालकाने वेग वाढविला. खजरी गावाजवळ चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करताना ब्रेक लावला. वेग अधिक असल्याने बस उलटून २० फूट रस्त्यापासून घासत गेली. अपघातात ११ प्रवासी ठार झाले असून दोघे गंभीर आहेत. २७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली. गोंदिया-कोहमारा मार्गावरील खजरी गावाजवळ उलटलेली शिवशाही बस क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आली.
Web Title: Accident Shivshahi bus overturns while sweeping 20 feet, 11 killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study