Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर अपघात, ट्रकने दोन वाहनांना उडविले

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर अपघात, ट्रकने दोन वाहनांना उडविले

Breaking News | Sangamner Accident: नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याची घटना.

Accident on Nashik Pune highway, truck overturns two vehicles

संगमनेर: नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील नांदूर-खंदरमाळ शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर रविवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.

अपघातात मंगेश काटीअण्णा शिंदे व सतीश संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संभाजी उत्तम शिंदे (रा. शिक्रापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक संदीप रोहिदास कानवडे (रा. एकलहरे, ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकचालक संदीप कानवडे हा रविवारी त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच- १४, जीडी ५७८६) घेऊन नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने चालला होता. नांदूर-खंदरमाळ शिवारात १९ मैल येथे ट्रकने वाहन (क्रमांक एमएच- १२, एक्सक्यू- ८२७५ व केए-३९-७८४७) या वाहनांना जोराची धडक दिली. अधिक तपास आर. के. कोरडे करीत आहेत.

Web Title: Accident on Nashik Pune highway, truck overturns two vehicles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here