महामार्गावर आगीच्या ठिणग्या, महामार्गावर एक भयानक अपघाताची घटना
Ahmednagar Pune Highway Accident: भरधाव इंडीव्हर कारने दुचाकीला जोराची धडक, दुचाकी रस्त्यावरुन फरफटत जात असताना महामार्गावर आगीच्या (Fire) ठिणग्या उडाल्या.
अहमदनगर: पुणे-अहमदनगर महामार्गावर सणसवाडी येथे एक भयानक अपघाताची घटना घडली. पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी येथे एका भरधाव इंडीव्हर कारने दुचाकीला जोराची धडक दिली. धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चारचाकी चालकाने कार थांबवली नाही. त्यानंतर दुचाकीला फरफटत नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दुचाकी रस्त्यावरुन फरफटत जात असताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या उडाल्या, हा संपूर्ण प्रकार महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दुचाकीस्वार हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे अहमदनगर महामार्गावर अपघात (Accident) घडत आहेत. या वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. पुण्यात इतर ठिकाणीही अपघातांचे प्रमाण बाढत असून जपून गाडी चालवण्याची विनंती केली जात आहे.
Web Title: Accident hit and taken away by a car accident on Ahmednagar Pune highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App