Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दिला मुलीला जन्म

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दिला मुलीला जन्म

Breaking News | Sangamner Crime: एका मुलीला जन्म दिल्यानंतर अत्याचार झाल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Abused a minor girl, gave birth to a girl child

संगमनेर: एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणीच्या पीएमटी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीने (आईने) दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (N), ३७६ (३) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४. ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता अटक केली असून त्याला तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे करत तपासाकामी पोलीस कोठडीची मागणी केली असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपी बोडखे आला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे यांने गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. तिच्याशी ठेवलेल्या शरीर संबंधातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीसाठी तिला लोणीच्या पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (२२ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abused a minor girl, gave birth to a girl child

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here