अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार अन जीवे मारण्याची धमकी
Breaking News Crime: दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीवर अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध भोकर पोलिसात पोक्सोचा गुन्हा.
नांदेड | भोकर : दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीवर अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध भोकर पोलिसात पोक्सोचा गुन्हा नोंदवून आरोपी निखिल माधव चंदापुरे (वय २०, रा. पिंपळगाव) आणि वाहन चालक आरोपी सुदर्शन राजू जंगेवाड (१९, रा. राजवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.
हदगाव तालुक्यातील रहिवासी असलेली व भोकरमधील एका शाळेत दहावी शिकत असलेली मुलगी शालेय घटक चाचणी परीक्षेसाठी आली होती. गुरूवार दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी पाठीमागून पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक वाहन आले. वाहन चालक व त्याचा मित्र दोघेही ओळखीचे होते. तरीही यातील आरोपी निखिल चंदापुरे याने पीडित मुलीचे तोंड दाबून जबरीने वाहनात बसवून नांदेड रस्त्यावर नेले. एके ठिकाणी वाहन थांबवून वाहनातच तिच्यावर जबरीने अत्याचार केला. नंतर पुन्हा मुदखेड रस्त्यावरील एका ठिकाणी घेऊन जावून पुन्हा अत्याचार केला व सदर प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या आई, वडिलांना जीवे मारतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच वाहनाने आरोपींनी तिला शाळेजवळ आणून सोडले. पीडित मुलीने वडिलांना फोन करून बोलावून घेतले व घरी गेल्यानंतर सर्व प्रकार सांगितला.
पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार आरोपी निखिल माधव चंदापुरे (वय २०, रा. पिंपळगाव) आणि वाहन चालक आरोपी सुदर्शन राजू जंगेवाड (१९, रा. राजवाडी) यांच्याविरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नामदेव जाधव पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Abuse and death threats against a minor student
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study