Breaking News | Ahmednagar: मेव्हण्याने राहुरी येथील अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना, आरोपी ताब्यात.
राहुरी: संगमनेर येथील मेव्हण्याने राहुरी येथील अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे दि. ७ एप्रिल रोजी घडली होती. या घटनेतील आरोपीला राहुरी पोलिसांनी राहता येथून ताब्यात घेतले.
या घटनेतील अल्पवयीन मुलगी कुटुंबासह संक्रापूर परिसरात राहते. पीडित मुलीचा मावस मेव्हणा कोंची येथील असून, सध्या तो संक्रापूर येथे राहत आहे. दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी पीडित मुलगी कामावरून घरी जाण्यासाठी तिच्या मावस मेव्हण्याच्या दुचाकीवर बसून गेली.
तेव्हापासून ते दोघे बेपत्ता होते. पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस पथक पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेत होते. यादरम्यान, आरोपीने पीडितेस राहता येथे ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. दि. २२ एप्रिल रोजी पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. तसेच त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करुन तिचा जबाब घेऊन तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
Web Title: Abduction of sister-in-law Sangamner accused arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study