धक्कादायक! भरधाव ट्रेलरने पोलीस उपनिरिक्षकाला चिरडले
Bhandara Accident News: भरधाव ट्रेलर चालकाने दुचाकीवरील पोलिसाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला, अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.
भंडारा: भरधाव ट्रेलर चालकाने दुचाकीवरील पोलिसाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे 24 तासातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपघाताची ही दुसरी घटना आहे. भंडाराऱ्यातील पवनी तालुक्यात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
भरधाव ट्रेलर चालकाने दुचाकी वरील पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात घडली आहे. ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राजपूत मते (56) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भंडारा पोलीस लाईन येथे राहणारे राजपूत मते हे लाखनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते.
याबाबत माहिती अशी की, रविवारी राजपूत मते हे सकाळी बाजारातून भाजी घेऊन दुचाकीने घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. या धडकेत राजपूत मते हे थेट ट्रेलरच्या चाकाखाली आले. चाकाखाली चिरडले गेल्याने राजपूत मते यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृत राजपूत मते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरात 24 तासात अपघाती मृत्युची दूसरी घटना घड़ल्यांने शहरातील वाहतूक व्यवस्था किती धोकादायक ठरत आहे याची प्रचिती येत आहे.
Web Title: A police sub-inspector was crushed by a speeding trailer Accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App