Breaking News | Sangamner Crime: साखर कारखाना येथे राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी फूस लावून पळवून नेले.
संगमनेर: संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी साखर कारखाना येथे राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी पालकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घुलेवाडी साखर कारखाना येथे नोकरी करणाऱ्या पालकाची १२ वर्षीय मुलगी पालकांच्या ताब्यात असताना अज्ञात इसमाने मंगळवारी गोड बोलून अमिष दाखवत पळवून नेले. तीन दिवस झाले अद्याप मुलगी घरी आलेली नाही. त्यामुळे संशियीत अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे.
Web Title: A minor girl was abducted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study