Home बुलढाणा शाळेत जात असताना अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

शाळेत जात असताना अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Breaking News  | Buldhana Crime: शाळेत जाणाऱ्या एका मुलीसोबत बळजबरी केली तसेच तिला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस. (sexually assaulted)

a lodge while she was going to school and sexually assaulted

बुलढाणाः जिल्ह्यात एक मेहकर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे.  शाळेत जाणाऱ्या एका मुलीसोबत बळजबरी केली तसेच तिला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या भयावह घटनेमुळे मेहकर शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,  शाळेत जात असताना दोन तरुणांनी मुलीवर बळजबरी करत तिला लॉज वर घेऊन गेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही मुलगी अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना दोन युवक दुचाकीवरून आले. तिची वाट अडवून तिला जबरदस्तीने गाडीवर बसवलं आणि लॉजवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पहाड अशी आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: a lodge while she was going to school and sexually assaulted

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here