मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
Shivajirao Kardile Passes Away: भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन.
राहुरी: विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.
भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास
1984-95 बुऱ्हानगर ता. नगर सरपंच.
1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था स्थापना.
1995 नगर -नेवासा अपक्ष आमदार.
1999 नगर – नेवासा अपक्ष आमदार.
2003-04 राज्यमंत्री, मत्स्य व बंदरे विकास
2004 राष्ट्रवादी , नगर- नेवासा आमदार
2007 अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक.
2008-09 अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन.
2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव.
2009 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी आमदार.
2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2019 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव.
2023 चेअरमन अहिल्यानगर जिल्हा बँक.
2024 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी
Breaking News: Shivajirao Kardile Passes Away