Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गाळ्यात आढळला मृतदेह

अहिल्यानगर: गाळ्यात आढळला मृतदेह

Breaking News | Ahilyanagar: कॉम्प्लेक्समधील तळमजल्यातील बंद गाळ्यात एका अज्ञात परप्रांतीयाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

Body found in the ditch

पाथर्डी: शहरात शुक्रवारी सकाळी वामनभाऊ नगर परिसरात मोठी खळबळजनक घटना उघडकीस आली. शहरातील शेवगाव रोडवरून स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील विष्णू गायकवाड यांच्या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यातील बंद गाळ्यात एका अज्ञात परप्रांतीयाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अंदाजे ६० ते ६५ वर्षीय पुरुषाचा असून, त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह पूर्णपणे फुगून कुजल्याने दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीमुळेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. गाळा उघडल्यावर आत

मृत्तदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस नाईक अमोल आव्हाड, भगवान गरगडे, सचिन गणगे आणि संजय जाधव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलवला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलीस तपासात गुंतले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, आणि मृत्यू नैसर्गिक आहे की यामागे घातपाताचा संशय दडलेला आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, वर्दळीच्या भागात बंद गाळ्यात असा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज आहे.

Breaking News: Body found in the ditch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here