संगमनेरात सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Crime: विदेशी दारू, कार असा एकूण ६ लाख २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संगमनेर : संगमनेरात विदेशी दारू, कार असा एकूण ६ लाख २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. सोमवारी (दि. १८) रात्री तालुक्यातील मंगळापूर गावाच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी फिर्याद दिली आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकोले तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र भगवान नवाळे (वय ३८, रा. इंदोरी, ता. अकोले) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या कारवाईत १ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीची विदेशी दारू, ५ लाख रुपये किमतीची कार (एमएच ०६, बीएफ १०१) असा एकूण ६ लाख २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारमधून विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलिस कॉन्स्टेबल सारबंदे, राहुल डोके हे पंचांसमक्ष कारवाईसाठी मंगळापूर गावच्या शिवारात पोहोचले. त्यांनी ही कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमाल शहर पोलिस ठाण्यात आणत नवाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक धनंजय महाले अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Sangamner goods worth six lakhs were seized, a case was registered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study