प्रेमाचं नाटक करून अत्याचार, जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Solapur Crime: लग्नाआधी अन् नंतर जबरदस्तीने अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.
सोलापूर : बेंगलोर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी प्रेमाचे नाटक करुन सूत जमवले. पळवून नेऊन लग्न केले. लग्नाआधी अन् नंतर जबरदस्तीने अत्याचार केल्याची फिर्याद पिडितेने सदर बझार पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी भां.दं. वि. ३७६ अन्वये १ जुलैच्या रात्री उशिरात गुन्हा नोंदला आहे. सदर प्रकार सन २०२० ते २९ मे २०२४ या कालावधीत कोटा पेठा, नवी पेठ करनूर (आंध्रप्रदेश) येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील फिर्यादी ही शहरातील एका भागात वास्तव्यास असून, २०२० मध्ये ती बेंगलोर येथे फिजीओ थेरपी शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षण घेत असताना तिची नमूद आरोपीशी ओळख झाली. त्याने गोड बोलून खोटे प्रेमाचे नाटक करुन पळवून नेऊन लग्न केले. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर ‘माझ्या जीवाचे बरेवाईट करतो’ असे म्हणून २०२० ते मे २०२४ च्या दरम्यान, त्याच्या राहत्या घरी कोठा पेठा, नवी पेठकरनूर येथे वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार करुन शिवीगाळ व मारहाण केली.
फिर्यादीचे आई-वडील आणि मामाला फोनवरुन ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि काटे करीत आहेत. सदरचा गुन्हा १ जुलैच्या पूर्वी घडल्याने भारतीय दंड विधान ३७६ कलमान्वये दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Web Title: abused threat of death by pretending to love
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study