Home महाराष्ट्र चोरच करोना पॉझिटिव्ह: पोलीस आणि कोर्टाचा स्टाफ क्वॉरंटाइन

चोरच करोना पॉझिटिव्ह: पोलीस आणि कोर्टाचा स्टाफ क्वॉरंटाइन

मुंबई(News): चोरीचा आरोप असलेला चोर करोना पॉझिटिव्ह असल्याने खळबळ उडाली. त्यामुळे पोलीस, कोर्टाच्या स्टाफमधील २४ जणांना क्वॉरंटाइन केले आहे. तसेच या चोराच्या संपर्कात आलेल्या त्यांचाही तपास करण्यात येत आहे.  

हा २४ वर्षीय तरुण आरोपी गोरेगाव येथे राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.  २० एप्रिल रोजी तो आणि त्याचे दोन मित्र जवळच्याच एका पानटपरीतून सिगारेट चोरण्यासाठी गेले असताना  या तिघांनी पानटपरीवाल्यावर चाकूचा हल्ला करून त्याच्याकडील ३५०० रुपयांची रोकड पळवून नेली.

या  तिघांनी लूट केल्यावर पानटपरीवाल्याने आरडाओरडा केल्याने दुसऱ्या दुकानदारांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पानटपरीवाल्याच्या तक्रारीनंतर या चोराविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Read: Salman Khan Upcoming Movies 2020 and 2021

दुसऱ्या दिवशी त्याला बोरिवलीच्या न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. तळोजा तुरुंगात त्याला नेले असता त्याची करोना टेस्ट केली नसल्याने तुरुंगाधिकाऱ्याने त्याला तुरुंगात घेतले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याची करोना टेस्ट केली आणि त्याला करोनाची लागण झाल्याचे आढळून आलं. त्यामुळे त्याला १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, त्या आरोपीला करोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तो एक रात्रभर पोलीस कोठडीत होता. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील पोलीस आणि कोठडीतील कैदी कोर्टातील दोन स्टाफ आदी २४ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

Website Title: News Thief Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here