Home अहमदनगर अहमदनगर:  गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

अहमदनगर:  गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

Breaking News | Ahmednagar: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद.

Youth arrested with Gavathi Katta

श्रीरामपूर : गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. तंजील गफार खान (२५, रा. फकीरवाडा, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.

शहरात नवीन तहसील कार्यालयाजवळ, मदर तेरेसा चौकात तरुण गावठी कट्टा घेवून फिरत होता. पोलिसांची चाहुल लागताच तो पळाला, मात्र पथकाने पाठलाग करुन त्याला शिताफिने पकडले. पोलिसांनी अंगझडती घेतली असता डाव्या कंबरेला गावठी कट्टा व दोन राऊंड मिळाले. ३५ हजार रुपयांचा राखाडी रंगाचा गावठी कट्टा, मॅगझीन व २ हजार रुपयांचे दोन राऊंड असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान सोळंके, दीपक मेढे, हवालदार शफिक शेख, पोलिस नाईक रघुवीर कारखेले, राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझराजा अत्तार, संभाजी खरात, अजित पटारे, धनजंय वाघमारे, शिवाजी बडे, आकाश वाघमारे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Youth arrested with Gavathi Katta

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here