चिंता करू नका मी राष्ट्रवादीतच: अजित पवार
मुंबई : बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी आज पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी मौन सोडत आज सोळा ट्वीट केले आहे. त्यातील हे एक ट्वीट स्पष्ट केले गेले आहे.
Website Title: Latest News Ajit Pawar tweet