भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस, निळवंडेही भरण्याच्या मार्गावर
Bhandardara Dam: भंडारदरा धरण पाणलोटात पाचव्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सायंकाळी विसर्ग 4295 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
भंडारदरा: नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पाचव्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने काल शनिवारी सायंकाळी विसर्ग 4295 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी हे धरण 6868 दलघफू (82.61) झाला असून रविवारी हे धरण 94 टक्के भरणार आहे.
गत आठवड्यापूर्वी पाणलोटात पावसाने काढता पाय घेतला होता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण गत पाच दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. एवढेच नव्हे तर आता विसर्ग वाढल्याने निळवंडे धरणही भरण्याची शक्यता वाढली आहे.
काल सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार रतनवाडीत तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. तर भंडारदरात काल दिवसभरात 19 मिमी पावसाची नोंद झाली. वाकीचा ओव्हरफ्लोही वाढला असून तो विसर्ग 197 क्युसेकपर्यंत गेला आहे. रात्री 7 वाजेनंतर पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे भंडारदरा धरणातील विसर्ग आणखी वाढणार आहे.
Web Title: Heavy rains in Bhandardara watershed, Nilavanda also on the verge of filling
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App