अहमदनगर: प्रेम संबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या, माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य
Ahmednagar News: प्रेमसंबंधातून लग्नापूर्वीच जन्माला आलेल्या बाळाला खदान विहिरीमध्ये खड्डा खोदून प्लास्टिकच्या पिशवीत घालून जिवंत पुरुन खुन केल्याची घटना उघडकीस.
जामखेड : प्रेमसंबंधातून लग्नापूर्वीच जन्माला आलेल्या बाळाला खदान विहिरीमध्ये खड्डा खोदून प्लास्टिकच्या पिशवीत घालून जिवंत पुरुन खुन केला. हा धक्कादायक अन् माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार जामखेड तालुक्यातील नायगाव या ठिकाणी घडला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सासरवाडीकडील लोकांच्या छळास कंटाळून काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत एक चार पाणी चिठ्ठी देखील लिहुन ठेवली होती. मात्र या घटनेला आता वेगळे वळण लागले असुन, यातील मयत मुलगा व त्याची आई व पत्नी या तिघांनीच नवजात बाळाचा खून केल्याने मयत लहान बाळाच्या आईवडीलासह आजीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील मयत हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व आरोपी पत्नी सविता कैलास जाधव यांचे लग्नापूर्वी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधामधुन त्यांना विवाहापूर्वीच पुरुष जातीचे बाळ जन्माला आले होते. यानंतर यातील मयत आरोपी हरिश्चंद्र राजेंद्र जाधव, बाळाची आई सविता कैलास जाधव मयत बाळाची आजी विमल राजेंद्र जाधव यांनी संगनमताने नवजात बालकास ठार मारण्याचे ठरवले. यानंतर दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळास घेऊन मयत बाळाचा बाप आरोपी हरिश्चंद्र जाधव हा नायगाव येथील बटईने करत असलेल्या शेतात बाळास घेऊन गेला यावेळी सदरचे बाळ कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत घालून शेतातील एका पडलेल्या खदान विहिरीत खड्डा निरीक्षक महेश जानकर, करून जिवंत पुरून टाकले.
घटनेनंतर सदर मयत हरिश्चंद्र जाधव व पत्नी बाळाची आई सविता जाधव यांनी आळंदी या ठिकाणी जाऊन लग्न देखील केले होते. मात्र आरोपीने पंधरा दिवसांपुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी लिहुन ठेवलेल्या चिट्टीत सासरवाडीकडील लोकांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या बाळास सारवाडीच्याच लोकांनी मारून टाकले आहे असा आरोप देखील चिट्टीत केला होता. या प्रकरणी सासरवाडीकडील लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून पोलिस या घटनेचा तपास करत असताना यामध्ये बाळाची आई वडील व आजी हेच बाळाचे मारेकरी निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस पोकॉ. शेषराव म्हस्के, पोना. शेंडे, अशोक बडे, बाळू खाडे, महिला पोलिस आयोद्या घोगरे यांच्या पथकाने मागील पंधरा दिवसांपासून तपास करत घटनेचा उलगडा केला आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर यांच्या फिर्यादीवरून वरील तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Murder of a baby born out of love
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App