Home क्राईम ‘ती’ गर्भवती होताच मजनूने काढला पळ

‘ती’ गर्भवती होताच मजनूने काढला पळ

Nagpur Crime: इन्स्टाग्राम फ्रेंडला अगोदर प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व तिच्यावर अत्याचार (Rape).

Caught in the trap of love and abused her

नागपूर: अल्पवयीन इन्स्टाग्राम फ्रेंडला अगोदर प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती गर्भवती झाल्याचे समजताच लग्नाच्या आश्वासनातून यू टर्न घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अभिषेक कमलाकर डोंगरे (१९) याची एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले व ती त्यात अलगदपणे अडकली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले. यातूनच ती गर्भवती झाली. तिने ही बाब अभिषेकला सांगितली असता त्याने हात वर केले व लग्न करणार नसल्याचे सांगितले. अखेर अल्पवयीन मुलीने नंदनवन पोलिस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदविली.

Web Title: Caught in the trap of love and abused her

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here