पैशासाठी पत्नीलाच केले परपुरुषाच्या स्वाधीन, शारीरिक संबध ठेवण्यास दबाव
Washim | वाशिम: स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पैसे घेत चक्क पत्नीलाच परपुरुषाच्या स्वाधीन करून त्याच्याशी शारीरिक संबध (sexual relations) ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा लज्जास्पद प्रकार तालुक्यातील वरोली येथील एका पतीने केला. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध २३ जून रोजी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिडीतेने मानोरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, पिडीत ही तिच्या पतीसोबत मुंबई येथे रोजगारासाठी गेली होती. तिला एक सात वर्षाची मुलगी आहे. मार्च २०२२ मध्ये तिच्या पतीने एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे घेतले व पिडीतेसह तिच्या मुलीस त्याच्याकडे सोपविले. आणि वडिलांची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगत आरोपीने गावी जाऊन येतो असे सांगतानाचा या व्यक्तीसोबत अनैतिक संबध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि तसे न केल्यास मुलीस मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पिदीतेला नाईलाजाने परपुरुषाशी शारीरिक संबध ठेवावे लागले. त्या व्यक्तीने तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित केल्याचे छायाचित्रण मोबाईलमध्ये करून ठेवले. असे पिडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. आरोपीविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: For money, he forced his wife to have sexual relations with him