अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप: तीन हजारांपेक्षा अधिक संख्या वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा चांगलाच उद्रेक झालेला आहे. एकाच दिवसात तब्बल ३ हजारपेक्षा जास्त संख्या आज आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३०९७ रुग्ण वाढले आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे.
जिल्हा प्रयोगशाळेत ८७१, खासगी प्रयोग शाळेत ८२९ आणि रॅपिड चाचणीत १३९७ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नगरमध्ये सर्वाधिक ६७५, राहतामध्ये त्याखालोखाल तीनशे अधीक तर संगमनेर दोनशेच्या अधिक आकडा पोहोचला आहे.
अहमदनगर शहरात ६७५, राहता ३५२, संगमनेर २६७, श्रीरामपूर १६५, नेवासे १३४, नगर तालुका १६९, पाथर्डी १९५, अकोले १४७, कोपरगाव १७७, कर्जत १९०, पारनेर १३३, राहुरी १०७, भिंगार शहर ४६, शेवगाव ११४, जामखेड ७९, श्रीगोंदे १०७, इतर जिल्हा २७, इतर राज्य ०३, मिलिटरी हॉस्पिटल १० जणांना संसर्ग झाला आहे.
Web Title: Corona outbreak in Ahmednagar more than 3 thousand