चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचारी नराधमास ४० वर्षांचा सश्रम कारावास
चारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार (abused) करणाऱ्या नराधमास विशेष सत्र न्यायालयाने तब्बल ४० वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा.
गोंदिया: चारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास विशेष सत्र न्यायालयाने तब्बल ४० वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत नोव्हेंबर २०१८ मध्ये हे प्रकरण घडले होते. मुकेश शेंडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित चिमुकली चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेली असता आरोपी मुकेशने तिला जबरदस्ती उचलून नेले व अंगणवाडीच्या मागे तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये आरोपी मुकेश शेंडे याला भादंवि कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा कारावास तसेच १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास. तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अंतर्गत २० वर्षांचा कारावास आणि १५ हजार रुपये तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास असा एकूण ४० वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Web Title: 40 years rigorous imprisonment for brutal abused of four-year-old child
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App