तरुण घरातून बेपत्ता, घरातल्यांनी सगळीकडे शोधलं…; पण रेल्वे रुळावर जाऊन बघताच…
रेल्वे रुळावर २७ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर: झेंडे चौक येथील रेल्वे रुळावर २७ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवार दि. २० रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे.
कुलदीप हिरालाल जैस्वाल वय २७ रा.मुकुंदवाडी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप मुकुंदवाडी परिसरामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. तो अविवाहित असून तो मजुरी करण्याचं काम करतो. दरम्यान कुलदीप सकाळी घराबाहेर गुरुवारी बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. घरच्यांनी खूप शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच शोध लागला नाही.
रात्री दहा वाजता झेंडा चौक येथील रेल्वे रुळावरती त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान पोलिसांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार दिगंबर धारबले करीत आहे.
Web Title: 27-year-old youth committed suicide by jumping in front of a moving train on the railway track
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App