बॉयफ्रेंडच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, मृतदेह प्रियकराच्या घरी सापडला
Breaking News | Jalna Crime: 18 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. शिवानी गिरी असे या मृत तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ.
जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या फत्तेपूर गावात 18 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. शिवानी गिरी असे या मृत तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल आघामसह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावात एका 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीचं नाव शिवानी गिरी असून बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आयुष्य संपविल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आला आहे, त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
शिवानीला आरोपी विशाल आघाम याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात विशाल आघामसह आणखी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शिवानीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: 18-year-old girl commits suicide after being threatened