अहमदनगर: पोलिसांच्या छाप्यात महिलेसह १३ जणांची सुटका, गांजासारख्या नशिल्या पदार्थांचा वापर करून….
Ahmednagar News: Police raid घरकामासाठी जबरदस्तीने आणलेल्या महिलेसह १३ वेठबिगारींची बेलवंडी पोलिसांनी सुटका केली.
श्रीगोंदाः घरकामासाठी जबरदस्तीने आणलेल्या महिलेसह १३ वेठबिगारींची बेलवंडी पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्कान मोहिमेंतर्गत बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यात आठ ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी वेगवेगळे आठ गुन्हे दाखल करत ११ जणांना आरोपी केले आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली.
खून, दरोडा आणि लुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना काही आरोपींनी घरकामासाठी काही लोक जबरदस्तीने आणल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. पोलिस चौकशीत मारहाण करून अर्धपोटी उपाशी ठेवत तसेच वेळप्रसंगी त्यांच्या खाण्यामध्ये गांजासारख्या नशिल्या पदार्थांचा वापर करून त्यांच्याकडून वेठबिगाराप्रमाणे काम करून घेतले जात होते. पोलिसांच्या छाप्यात एक महिलेसह व बारा पुरुष वेठबिगारांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपी
चारुशिला रघुनाथ चव्हाण, रघुनाथ रायफल चव्हाण, झिलुर रायफल चव्हाण, अमोल गिरीराज भोसले, आबा जलिंदर काळे, दालखुश मुकींदा काळे, नंदू किलचंद गव्हाणे, सागर सुदाम गव्हाणे, आब्बास संभाजी गव्हाणे, सचिन जयसिंग गव्हाणे, काळुराम पाटीलबा पवार. यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू आहे.
Web Title: 13 persons including woman rescued in police raid
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App