धनंजय मुंडेंचा राजीनामा, खासदार नरेश म्हस्के म्हणाले क्रूरकर्माला फासावर लटकवा
Dhananjay Munde Resign: आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती,
आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
भाजप,राष्ट्रवादीसह आता शिवसेना देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आता वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा अशी मागणी केली आहे.
Web Title: Dhananjay Munde Resign