अहिल्यानगर: महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
अहिल्यानगरः घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे २ मार्च रोजी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
सुमन लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मॅक्स केअर हॉस्पिटल येथे औषधोपचाराकरिता नेले.
डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांच्यावर उपचार सुरू केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोपट खराडे हे करीत आहे.
Web Title: Woman drowned in water