संगमनेरात तरुणीची छेडछाड, तरुणावर पोक्सो दाखल
Breaking News | Sangamner Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची धक्कादायक घटना संगमनेर बसस्थानक परिसरात घडली.
संगमनेर : बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची परीक्षेला पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची धक्कादायक घटना संगमनेर बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कौठे कमळेश्वर येथील तरुणावर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनीचा बारावीचा पेपर असताना पाठीमागे बसणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दोघेही एकमेकांना कॅन्टीनमध्ये भेटत असतात. त्यावेळी दोघांनी चहा पिताना सेल्फी देखील काढले. याचा फायदा घेऊन तरुणाने तिच्याकडे लग्नाची मागणी केली. तेव्हा तिने त्यास नकार दिला. दरम्यान पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयातून घरी जात असताना बसस्थानक परिसरात आली असता तेव्हा त्याने तिला पुन्हा तिचा हात पकडून तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या आणि माझ्या फोटोचे पोस्टर गावात लावतो, अशी धमकी देऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, तरुण पाठलाग करून पीडितेला मानसिक त्रास देत होता. तिने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपल्या वडिलांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठत सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून कौठे कमळेश्वरमधील मुसळे वस्ती येथील तरुणावर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Young girl molested in Sangamner, POCSO filed against young man
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News