Home नागपूर मम्मी-पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते; पण पवनने माझा… १७ वर्षीय विद्यार्थिनीने...

मम्मी-पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते; पण पवनने माझा… १७ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन

Nagpur Rape Case: बलात्कार पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची थरारक घटना.

Thrilling incident of 17-year-old rape victim's suicide

नागपूर : बलात्कार पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. ही थरारक घटना नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासह विविध कलमां अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पवन टेकाम (वय २०) आणि त्याची प्रेयसी बबिता (वय २०, बदललेले नाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलीचे आई-वडील बाहेर गेले होते. मात्र तिचा भाऊ घरीच होता. या दरम्यान तिने खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. शेजाऱ्याला ती दिसली. त्याने तिच्या वडिलांना माहिती दिली.

या प्रकरणातील मृतक स्वरा (बदललेले नाव) ही बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, स्वराचे वडील ऑटोचालक असून आई खासगी काम करते. तिला लहान भाऊ आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पवन व बबिताचे प्रेमसंबंध होते. याचदरम्यान त्याचे स्वरासोबतही प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने स्वरावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपासून स्वराला पवन व बबिताच्या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाली. तिने पवनला जाब विचारला. ‘बबिताला सोडून मी तुझ्यासोबतच राहीन’, असे आश्वासन त्याने स्वराला दिले. मात्र त्यानंतरही त्याने बबितासोबतचे संबंध कायम ठेवले. स्वराने त्याला पुन्हा विचारणा केली. दोघेही स्वराचा शारीरिक व मानसिक छळ करायला लागले. स्वरा तणावात राहायला लागली.

सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिचे आई-वडील बाहेर गेले होते. भाऊ घरीच होता. यादरम्यान स्वराने खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. शेजाऱ्याला ती दिसली. त्याने स्वराच्या वडिलांना माहिती दिली. वडील घरी आले. ऑटोने तिला मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासून स्वराला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

सुसाईड नोटमध्ये काय?

‘मम्मी-पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. पवनने माझा वापर केला, माझे शारीरिक शोषण केले. त्याची प्रेयसी बबितानेही माझा मानसिक छळ केला. ‘दोन महिन्यांत बबिताला सोडतो व कायमचा तुझ्यासोबत राहतो’, असे त्याने सांगितले होते. दोघांनी मला खूप ‘टॉर्चर’ केले आहे’, असे स्वराने आत्महत्येपूर्वी इंग्रजीत लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्याआधारे पोलिसांनी पवन व बबिताविरुद्ध बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Thrilling incident of 17-year-old rape victim’s suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here