नाशिक पुणे महामार्गावर बसला अचानक लागली आग अन केबिन जळून खाक; अन प्रवासी
Breaking News | Sinner Accident: नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाट नजिक अचानक बसने पेट (Fire) घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत चालकाच्या केबिनने पेट घेतला.
सिन्नर: नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाट नजिक अचानक बसने शनिवारी दि 23 सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत चालकाच्या केबिनने पेट घेतला. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
या बाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहीती आशी की, सिन्नर डेपोची नाशिक ते सिन्नर सिन्नर बस क्रमांक एम एच 40 एन 94 21 ही सिन्नर नाशिक प्रवासी घेऊन नाशिक पुणे महामार्गावरून प्रवास करत होती. चालक, वाहक तसेच दहा प्रवासी बसमध्ये होते.
ही नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटाच्या अलीकडे बस आली असता चालक यांना अचानक बसच्या केबिन मधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गाडी रस्त्यावर उभी केली. सर्व प्रवाशांना खाली उतरवले, तोपर्यंत केबिन मध्ये पेट घेतला. फक्त 15 ते 20 मिनिटांत संपूर्ण केबिनला आग लागली व केबिन पूर्ण जळून गेल्याने तात्काळ सिन्नर एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडचे जवानांनी यांनी आग विझवण्यासाठी शेतीचे प्रयत्न केले.
या घटनची माहिती मिळताच एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडचे जवान तसेच सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशामकचे जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न करून आग आटोक्यात आली.
बसच्या संपूर्ण कॅबिनचे आगीत नुकसान झाल्याचे सूत्रांकडून समजते. घटनास्थळी मुसळगाव व सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस तसेच सिन्नर बस स्थानकाचे प्रमुख हे घटना स्थळी दाखल झाले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title: sudden fire broke out on the Nashik Pune highway and the cabin was gutted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study