धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यानंच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार
Akola Crime: अकोल्यात पोलीस शिपायानेच आपल्या सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना.
अकोला: अकोल्यात पोलीस शिपायानेच आपल्या सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवम दुबे असे या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहकारी मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवरून मैत्री करीत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. सध्या शिवम दुबे फरार झाला आहे. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
‘सद्रक्षणाय, खलनिग्रहनाय’ असं ब्रीद असलेल्या पोलीस दलांत अकोल्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपानं खळबळ उडाली आहे. यासोबतच पीडितेला आरोपी पोलिसानं सातत्याने ब्लॅकमेल देखील केल्याचं देखील समोर आलं आहे. शिवम दुबे असं या पोलीस पोलीस शिपायाचं नाव असून असा तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आधी शिवमनं पीड़ित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. याच ओळख अन प्रेमाचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याच तक्रारीत नमूद आहे. दीर्घ काळानंतर आरोपी ब्लॅकमेल करायला लागल्यानं पिडीत महिलेने अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी तक्रार केली. यानंतर आरोपी दुबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता, यादरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. यातूनच शिवमचं ‘त्या’ मित्र झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. याचदरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. शिवमनं आपल्या या मित्राच्या पत्नीला ‘फेसबुक’वर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.
त्यानंतर शिवम आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यातच शिवमने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं शिवमनं मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. शिवमनं पंडित विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी तसेच अमरावती येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील पीडित महिलेवर शिवमनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (rape) ठेवले होते. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून शिवमवर आकोट शहर पोलीस ठाण्यात 526/2023 कलम 354, 354 (अ), 354 (ड), 376(1) (ए), 376(2) (एन), 376 (3) या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक योगिता ठाकरे करीत आहेत. या प्रकरणाची अकोल्याच्या पोलीस दलात मोठी चर्चा असून यावरून मोठी खळबळ उडाली आहे.
Web Title: policeman also rape his colleague’s wife
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App