अहमदनगर: ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळले
Ahmednagar Rahuri News: चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण.
राहुरी: तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याचे काल बुधवारी समोर आले. चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी थांबविण्यात आली. काल बुधवारी सकाळी विठ्ठल भाऊराव शेटे यांच्या सर्वे नंबर २६४ मध्ये ऊसतोड कामगार तोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे कामगारांना दिसली. त्यांनी विठ्ठल शेटे यांना ही माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी वनविभागास कळविले असता वनविभागाचे वामन लांबे, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन ४ बछडे ताब्यात घेतले आहेत. दरम्यान ४ बछडे असल्याने या ठिकाणी मादीचा वावर असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.
उसाचे शेत हे बिबट्याचे प्रमुख निवासस्थान झाले असून गेल्या काही दिवसात ऊस तोडणी करताना बिबट्याचे बछडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस तोड कामगार मजुरांनी ऊस तोडणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Title: Four leopard cubs were found while cutting sugarcane
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App