ट्रक व पिकअपचा भीषण अपघात, तीन जण ठार, एक जखमी
औरंगाबाद: वैजापूर – गंगापूर रस्त्यावर आशीर्वाद हॉटेल समोर ट्रक आणि मजुरांच्या गाडीचा आज संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात तीन जण ठार एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाली, वैजापूरकडे जाणारा ऊसाचा ट्रक (एम.एच.18, 2737) आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन (एम.एच.13, सीयू- 1500) या दोन्ही वाहनांची वैजापूर – गंगापूर रस्त्यावर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात पिकअप व्हॅनचा चुराडा होऊन त्यामध्ये प्रवास करणारे अरविंद सुरवसे (वय 28 वर्ष, रा.सोलापूर), अक्षय क्षिरसागर (वय 30 वर्ष, रा.सोलापूर) व गणेश शिरसाठ (वय 30 वर्ष,रा.अहमदनगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर शिवशंकर संघवी (रा.चाकूर, जिल्हा-लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
अपघातस्थळी पोहचलेल्या डॉ. प्रशांत पांढुरे, डॉ. नितीन वालतुरे, सुराशे, अजीम पटेल व अनंता कुमावत यांनी मदतकार्य केले. पिकअप व्हॅन मधील मृत व जखमी मजुरांना त्यांनी बाहेर काढले.
Web Title: Accident Truck and pickup crash kills three